District Information

उस्मानाबाद हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील एक जिल्हा आहे. उस्मानाबाद चे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. हैदराबादचा 7 वा निजाम मीर उस्मान अली खान याने या धाराशिव चे नाव बदलून उस्मानाबाद असे ठेवले . उस्मानाबाद या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7569 चौरस किलोमीटर आहे .
जिल्ह्याचे भौगोलीक स्थान
धाराशिव जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात व मराठवाड्यात त्याच्या नैर्ऋत्येला आहे. जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात. उस्मानाबादच्या नैर्ऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत.जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे.जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान डोंगराने व्यापलेला आहे
जिल्ह्याचे हवामान
जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते.
जिल्ह्यातील तालुके
1उस्मानाबाद 2. तुळजापुर. 3 कळंब 4.वाशी. 5. भुम. 6 लोहारा.7 परंडा 8. उमरगा
वाहतुक
राष्ट्रीय महामार्ग क्र. ९- हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. २११- गदग-कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ हा उस्मानाबाद शहरातून जातो
उस्मानाबाद शहर मध्य रेल्वेवर, लातूरर रोेड - मिरज या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला, नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत .
जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांकासह-
१) राष्ट्रीय महामार्ग ५२- संगरूर(पंजाब)-हिस्सार(हरियाणा)-कोटा-इंदूर-धुळे-छत्रपती संंभाजी महाराज नगर-बीड-उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर-विजयपूर-हुबळी-अंकोला(कर्नाटक)
(जिल्ह्यातील या महामार्गावरील गावे- पारगाव-कुंथलगिरी फ़ाटा-तेरखेडा-येरमाळा-येडशी-उस्मानाबाद-तुळजापूर-तामलवाडी)
२) राष्ट्रीय महामार्ग ६३- बार्शी-येडशी-ढोकी-मुरूड-लातूर-उदगीर-निझामाबाद(तेलंगाणा)-सिरोंचा(महाराष्ट्र)-जगदलपूर(छत्तीसगढ)-कोतापड(ओडिशा)-बोरीगुम्मा
३) राष्ट्रीय महामार्ग ६५- पुणे-इंदापूर-सोलापूर-उमरगा-हैद्राबाद-विजयवाडा-मच्छलीपट्टणम(आंध्र प्रदेश)
(जिल्ह्यातील या महामार्गावरील गावे- अणदूर-नळदुर्ग-जळकोट-येणेगूर-दाळिंब-उमरगा-तुरोरी)
४) राष्ट्रीय महामार्ग ३६१- तुळजापूर-लातूर-अहमदपूर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-बुटीबोरी(नागपूर जवळ)
५) राष्ट्रीय महामार्ग ५४८बी- मंठा-सेलू-पाथरी-सोनपेठ-परळी-अंबाजोगाई-लातूर-औसा-उमरगा-येणेगूर-मुरूम-आलूर-अक्कलकोट-नागणसूर-विजयपूर-अथणी-चिकोडी-संकेश्वर-गोतूर(कर्नाटक)
६) राष्ट्रीय महामार्ग ५४८-सी- सातारा-कोरेगाव-म्हसवड-माळशिरस-अकलूज-टेंभूर्णी-बार्शी-येरमाळा-कळंब-केज-माजलगाव-परतूर-मंठा-लोणार-मेहकर-खामगाव-शेगाव-अकोट-अंजणगाव-बैतूल(मध्य प्रदेश)
७) राष्ट्रीय महामार्ग ६५२- तुळजापूर-अणदूर-नळदुर्ग-हन्नूर-अक्कलकोट
विमानसेवा
उस्मानाबाद जिल्ह्याचे उत्तर दिशेला 10 किलो मीटर वरती विमानतळ आहे.

तुळजापूर
हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदेवता. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात. एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.अनेक भाविके रोज येतात.
उस्मानाबाद - तुळजापूर अंतर 22 कि.मी. आहे. व सोलापूर येथून ४५ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे. रेल्वे ने सोलापूर किवा उस्मानाबादला येवु शकता तेथून बस चालू आहे
कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रूपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युद्ध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देवीने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले. निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करीत नसत. 1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती. या साली गावची लोकसंख्या सूमारे ५००० इतकी होती.
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील काही शिल्प हेमाडपंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.
या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे. पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे श्री गणेश मंदिर आहे. येथे सिद्धीविनायक आहे. नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो. हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आले आहे. हे पाच मजली इमारत असून धर्म दर्शन व मुख दर्शन असे भाग केले आहेत.
गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे. तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती दिसते. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही. देवीची पूर्वी तीन वेळा पूजा केली जात असे. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी पूजा केली जाते. गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे. तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)
तुळजाभवानी दसरा महोत्सव मध्ये देवीच्या आकर्षक अलंकार पूजा मांडण्यात येतात. भारतात एक मात्र मुर्ती जी स्थलांतरित आहे. देवी वर्षातून तीन वेळा नीद्रा घेते. दोन वेळा चांदीच्या पलंगावर व एक वेळा नगर वरुण पलंग येतो.
सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती, शंकराची स्वयंभू पिंड, पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह, खंडोबा, चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीस पडतात.
उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. एक आकर्षण करून घेणार देवस्थान महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजीराजांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली. आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती. रामदास स्वामी हे देखील उपासक होते.महाराष्ट्राचे अराद्यादेवत आहे.

जिल्हा कार्यालय- उस्मानाबाद
कार्यालयाचे नाव – जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख उस्मानाबाद
कार्यालयाचा पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, उस्मानाबाद पिन नं 413501
अधिका-याचे नाव – डॉ. वसंत सदाशिव निकम (जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख उस्मानाबाद)
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक- 02472 222145
कार्यालयीन ई-मेल आय. डी.- dyslrosmanabad1@gmail.com
कर्मचा-यांची संख्या - 12
1 )तालुका कार्यालय- उस्मानाबाद
कार्यालयाचे नाव – उप अधिक्षक भुमि अभिलेख उस्मानाबाद
कार्यालयाचा पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, उस्मानाबाद पिन नं 413501
अधिका-याचे नाव – श्री. अशोक किसन माने (उप अधिक्षक भुमि अभिलेख उस्मानाबाद)
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक- 02472 22595
कार्यालयीन ई-मेल आय. डी.- dyslrosmanabad94@gmail.com
कर्मचा-यांची संख्या – 25
2)तालुका कार्यालय- भुम
कार्यालयाचे नाव – उप अधिक्षक भुमि अभिलेख भुम
कार्यालयाचा पत्ता- शासकीय ईमारत अलम प्रभु देवस्थान जवळ, भुम, जि. उस्मानाबाद
अधिका-याचे नाव – श्री. शिवाजी देवीदासराव पंडीत (उप अधिक्षक भुमि अभिलेख भुम)
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक- 02478 273541
कार्यालयीन ई-मेल आय. डी.- dyslrnhum@gmail.com
कर्मचा-यांची संख्या - 15
3)तालुका कार्यालय- कळंब
कार्यालयाचे नाव – उप अधिक्षक भुमि अभिलेख कळंब
कार्यालयाचा पत्ता- मध्यवर्ती शासकीय ईमारत पहिला मजला, कळंब, जि. उस्मानाबाद
अधिका-याचे नाव – श्री. दिलीप वसंतराव मोरे (उप अधिक्षक भुमि अभिलेख कळंब)
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक- 02473 262232
कार्यालयीन ई-मेल आय. डी.- dyslrkalamb@gmail.com
कर्मचा-यांची संख्या – 25
4)तालुका कार्यालय- परंडा
कार्यालयाचे नाव – उप अधिक्षक भुमि अभिलेख परंडा
कार्यालयाचा पत्ता- शासकीय विश्रामगृहा समोर महावीर ईलेक्ट्रॅनीक्स दुसरा मजला परंडा, जि. उस्मानाबाद
अधिका-याचे नाव – श्री. सुरेश रामभाउ कापसे (उप अधिक्षक भुमि अभिलेख परंडा)
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक- 02477 232223
कार्यालयीन ई-मेल आय. डी.- dyslrparanda1@gmail.com
कर्मचा-यांची संख्या - 19
5)तालुका कार्यालय- तुळजापुर
कार्यालयाचे नाव – उप अधिक्षक भुमि अभिलेख तुळजापुर
कार्यालयाचा पत्ता- शुभांजली निवास नळदुर्ग रोड, तुळजापुर जि. उस्मानाबाद
अधिका-याचे नाव – श्री. नितीन वामनराव वाडकर (उप अधिक्षक भुमि अभिलेख तुळजापुर)
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक-
कार्यालयीन ई-मेल आय. डी.- dyslrtuljapur@gmail.com
कर्मचा-यांची संख्या - 23
6)तालुका कार्यालय- उमरगा
कार्यालयाचे नाव – उप अधिक्षक भुमि अभिलेख उमरगा
कार्यालयाचा पत्ता- आरोग्य नगर, उमरगा जि. उस्मानाबाद
अधिका-याचे नाव – श्रीमती. वैशाली शामराव गवई (उप अधिक्षक भुमि अभिलेख उमरगा)
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक- 02475 251012
कार्यालयीन ई-मेल आय. डी.- dyslromrga1@gmail.com
कर्मचा-यांची संख्या – 19
7)तालुका कार्यालय- लोहारा
कार्यालयाचे नाव – उप अधिक्षक भुमि अभिलेख लोहारा
कार्यालयाचा पत्ता- दत्त नगर, लोहारा जि. उस्मानाबाद
अधिका-याचे नाव – श्रीमती. वैशाली शामराव गवई (उप अधिक्षक भुमि अभिलेख लोहारा)
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक- 02475 266081
कार्यालयीन ई-मेल आय. डी.- dyslrlohara@gmail.com
कर्मचा-यांची संख्या - 15
8)तालुका कार्यालय- वाशी
कार्यालयाचे नाव – उप अधिक्षक भुमि अभिलेख वाशी
कार्यालयाचा पत्ता- स्टेत बॅंक ऑफ़ इंडीया, शिवाजी नगर ,वाशी, जि. उस्मानाबाद
अधिका-याचे नाव – श्रीमती. स्मीता गौड (उप अधिक्षक भुमि अभिलेख वाशी)
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक- 02478 276004
कार्यालयीन ई-मेल आय. डी.- dyslrlw@gmail.com
कर्मचा-यांची संख्या - 15

कॉर्स स्टेशनची स्थापना
उस्मानाबाद जिल्हयात मुख्यत: दोन ठिकाणी कॉर्स स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे.
- येडशी ( तालुका – उस्मानाबाद )
- होर्टी ( तालुका-तुळजापुर )
कॉर्स स्टेशन हे रोव्हर्स नेटवर्क साठी मदत करतात, त्यामुळे प्रशासनास प्रलंबीत मोजणी प्रकरणे शुन्य साध्य करण्यास
मदत होईल.

ड्रोन चा वापर करुन नगर भुमापन करणे
हवाई छायाचित्रणाच्या माध्यमातुन नगर भुमापन करण्याचे हे एक अधुनिक तंत्रज्ञान आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शिराळा हे गाव ड्रोन चा वापर करुन नगर भुमापन केलेले पहिले गाव आहे. स्वामित्व योजने अंतर्गत चा हा एक पायलट प्रकल्प असुन हा प्रकल्प सर्व्हे ऑफ़ इंडीया , ग्राम विकास विभाग आणि भुमि अभिलेख विभाग यांचे अंतर्गत राबवला जात आहे.