
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 हा एक क्रांतिकारी कायदा आहे. या कायद्यात अशी तरतूद आहे
की,नागरिकांना राज्य सरकार पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने सेवा प्रदान करेल. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, विभागाने भूमी अभिलेख विभागाच्या अधिनस्त कार्यालयांद्वारे देण्यात येणा-या सार्वजनिक सेवा अधिनियमाच्या कलम 3 (1) अन्वये दिनांक 05/08/2016, 30/12/2017, 23/04/2018 व 10/05/2018 रोजीच्या अधिसूचनेद्वारे अधिसूचित केलेल्या आहेत. विभागाच्या वेबसाइटवर जाऊन या कायद्यांतर्गत कोणत्या सेवा उपलब्ध आहेत याची संपूर्ण माहिती नागरिकांना मिळू शकते. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिक महाराष्ट्र सरकारच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलचा वापर करून ऑनलाइन अर्ज करू शकतात. पुरेशा कारणाशिवाय सेवा प्रदान करण्यास विलंब झाल्यास किंवा सेवा नाकारल्यास, नागरिक प्रथम आणि द्वितीय अपील विभागातील वरिष्ठ अधिका-यांकडे दाखल करू शकतात आणि तृतीय आणि अंतिम अपील महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगा समोर दाखल करू शकतात.

In order to ensure effective implementation of this Act, Department has
notified the public services rendered by the subordinate offices of Land Records Department vide
Notification dated 05/08/2016, 30/12/2017, 23/04/2018 and 10/05/2018 under Section 3 (1) of the
Act. Citizens can get complete information regarding which services are available under this Act by
accessing the website of the Department.