इज ऑफ डुईंग बिजनेस

व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business, EoDB)-
पार्श्वभूमी-
डुइंग बिझनेस प्रकल्प 190 अर्थव्यवस्थांमध्ये आणि उप-राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर निवडलेल्या शहरांमध्ये व्यवसाय नियमांचे आणि त्यांच्या अंमलबजावणीचे वस्तुनिष्ठ उपाय प्रदान करतो.
2002 मध्ये सुरू करण्यात आलेला डुइंग बिझनेस प्रकल्प, देशांतर्गत लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी असून त्यांच्या जीवन चक्राद्वारे त्यांना लागू होणार्या नियमांचे मुल्यमापन करतो.
सर्व अर्थव्यवस्थांमध्ये आणि कालांतराने व्यवसाय नियमन वातावरणाची तुलना करण्यासाठी सर्वसमावेशक परिमाणात्मक डेटा एकत्रित करून आणि त्याचे विश्लेषण करून, अधिक कार्यक्षम नियमनासाठी स्पर्धा करण्यासाठी डुइंग बिझनेस अर्थव्यवस्थांना प्रोत्साहित करते. त्याचप्रमाणे सुधारणांसाठी मोजता येण्याजोगे बेंचमार्क प्रदान करते; आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेच्या व्यावसायिक वातावरणात स्वारस्य असलेल्या शैक्षणिक, पत्रकार, खाजगी क्षेत्रातील संशोधक आणि इतरांसाठी संसाधन म्हणून काम करते.
या व्यतिरिक्त, डुइंग बिझनेस तपशीलवार उप-राष्ट्रीय अभ्यास माहिती पुरविते, जे संपूर्णपणे एका राष्ट्रातील विविध शहरे आणि प्रदेशांमध्ये व्यवसाय नियमन आणि सुधारणा समाविष्ट करतात. हे अभ्यास व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी डेटा प्रदान करतात, प्रत्येक स्थानास मानांकन देतात आणि प्रत्येक निर्देशक क्षेत्रामध्ये कामगिरी सुधारण्यासाठी सुधारणांची शिफारस करतात. निवडलेली शहरे त्यांच्या व्यवसायाच्या नियमांची तुलना अर्थव्यवस्थेतील इतर शहरांशी आणि डुइंग बिझनेसने मानांकन दिलेल्या 190 अर्थव्यवस्थांशी करू शकतात.
उद्देश-
जगभरातील व्यवसायासाठी नियामक वातावरण समजून घेण्यासाठी आणि सुधारण्यासाठी एक वस्तुनिष्ठ आधार प्रदान करणे, हे या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. सर्व कायदे, नियम आणि नियम/पालन यांची प्रासंगिकता आणि आवश्यकता तपासणे हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे. वेळ आणि खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी आणि उद्योगपती/गुंतवणूकदारांसाठी व्यवसाय करणे सुलभ व्हावे, यासाठी सरकार ते व्यवसाय आणि सरकार ते नागरिक इंटरफेस सुलभता, तर्कसंगत आणि डिजीटल करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
इतिहास-
डुइंग बिझनेस प्रकल्प जागतिक बँकेने सन 2002 मध्ये सुरु केला होता, याद्वारे देशांतर्गत लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांकडे लक्ष देऊन आणि त्यांच्या जीवन चक्राद्वारे त्यांना लागू होणाऱ्या नियमांचे मुल्यांकन केले जाते.
इज ऑफ डुइंग बिझनेस रँकिंग-
इज ऑफ डुइंग बिझनेस (EoDB) इंडेक्स ही जागतिक बँक समूहाने स्थापन केलेली क्रमवारी प्रणाली आहे. EoDB निर्देशांकामध्ये, 'उच्च रँकिंग' (कमी संख्यात्मक मूल्य) व्यवसायांसाठी चांगले, सामान्यतः सोपे, नियमन आणि मालमत्ता अधिकारांचे मजबूत संरक्षण दर्शवते.
या संशोधनाद्वारे 190 अर्थव्यवस्थांसाठी डेटा पुरविला जातो आणि व्यवसाय नियमनाच्या खालील 10 क्षेत्रांमधील माहिती एकत्रित केली जाते.
- व्यवसायाची सुरूवात करणे.
- बांधकाम परवानग्यांशी संबंधित
- वीज पुरवठा
- मालमत्तेची नोंदणी करणे
- क्रेडिट मिळवणे
- अल्पसंख्याक गुंतवणूकदारांचे संरक्षण
- कर भरणे
- बाहेरीलदेशांशी व्यापार
- कराराची अंमलबजावणी
- दिवाळखोरीचे निराकरण
एकंदर EoDB रँकिंग विकसित करण्यासाठी नमूद केलेल्या प्रत्येक क्षेत्रामधील रँकिंग आणि त्याचे मूल्य वापरले जाते. उच्च EoDB रँकिंग म्हणजे नियामक वातावरण व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो चालू ठेवण्यासाठी अधिक अनुकूल आहे.
भारत- व्यवसाय सुलभतेचे रँकिंग -
जागतिक बँकेच्या अहवालानुसार निवडलेल्या 190 देशांपैकी, सन 2020 मध्ये भारत 63 व्या क्रमांकावर आहे. सन 2014 मध्ये, भारत सरकारने नियामक सुधारणांचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला असून ज्याचा उद्देश भारतात व्यवसाय करणे सोपे व्हावे हा आहे. या कार्यक्रमाद्वारे अधिक व्यवसाय-अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले आहेत. 3 वर्षात 67 रँकच्या सुधारणेसह भारत सलग तिसर्यांदा अव्वल 10 सुधारकांपैकी एक आहे.
भारत हे केवळ गुंतवणुकीसाठीच नव्हे तर व्यवसाय करण्यासाठीही सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. जागतिक बँकेच्या इज ऑफ डुइंग बिझनेस रँकिंग 2020 मध्ये भारताने 142 व्या (2014) स्थानावरून 63 व्या (2019) स्थानावर झेप घेतली आहे.
भारत सरकारमधील संपर्क मंत्रालय आणि विभाग-
व्यवसाय सुलभतेच्या कार्यक्रमासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, हे संपर्क मंत्रालय आणि उद्योग विभाग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहनासाठी (DPIIT) संस्थात्मक दुवा म्हणून काम करीत आहे.
महाराष्ट्र सरकारमधील संपर्क मंत्रालय आणि विभाग-
उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र सरकार हे संपर्क मंत्रालय आहे आणि उद्योग संचालनालय, महाराष्ट्र सरकार हा राज्यातील व्यवसाय सुलभतेसाठी संपर्क विभाग आहे.
राज्य सुधारणा कृती योजना (SRAP) आणि जिल्हा-स्तरीय व्यवसाय सुधारणा कृती योजना (DIBRAP)-
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांनी सन २०१४ पासून राज्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील पायरी म्हणून राज्य सुधारणा कृती योजना (SRAP) आणि जिल्हा-स्तरीय व्यवसाय सुधारणा कृती आराखडा (DIBRAP) जारी केला आहे. या दिशेने, महाराष्ट्र सरकार राज्य स्तरावर SRAP आणि जिल्हा स्तरावर DIBRAP ची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत आहे. राज्यात व्यवसाय करणे सुलभ करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या सुधारणेच्या आधारे जिल्ह्यांची क्रमवारी लावली जाईल.
इज ऑफ डुइंग बिझनेस (EoDB) मध्ये भूमी अभिलेख विभागाकडून सुधारणा -
- मालमत्ता नोंदणी-
- सर्व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारअभिलेखांचे डिजीटायझेशन करून त्यांचे
प्रकाशन करणे-
- सर्व 7/12 आणि मालमत्तापत्रकांचे डिजीटायझेशन करण्यात आले असून डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत ऑनलाइन उपलब्ध आहे.
- शोधण्यायोग्य मेटाडेटा देण्यासाठी राज्यानेभूनक्शा ची सेवा सुरू केली आहे. भूनक्शा या वेबसाइटमध्ये शोधण्यायोग्य मेटाडेटा, म्हणजे स.न., नं. भु.क्र. इत्यादी आहे.
- विभागाच्या सर्व सेवासाठी https://Mahabhumi.gov.in ही वेबसाइट विकसित करण्यात आलेली आहे. या वेबसाइटसाठी ऑनलाइन प्रदान केलेली माहिती अद्ययावत करण्यात आलेली असून आता संबंधित कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता नाही.
ब) मालमत्तेशी संबंधित अभिलेखांचे एकत्रीकरण-
१. सर्व 7/12 आणि मालमत्ता पत्रकांचे डिजीटायझेशन करून ते डिजिटल
स्वाक्षरीत करण्यात आले असून महाभूमी वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
२. भूमी अभिलेख विभागाच्या महसूल न्यायालयीन प्रकरणांची माहिती
नागरिकांसाठी eQjcourts या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
https://eqjcourts.gov.in
३. दिवाणी न्यायालयातील प्रकरणाची माहिती मिळविण्यासाठी 7/12 आणि
मालमत्ता पत्रक वेबसाइटचे एकत्रीकरण eCourts वेब साइटसह करण्यात
आले आहे.
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink/eCourt/eCourt
४. भूमापन नकाशा व ७/१२ यांची सांगड
https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in या भूनक्शा वेबसाइटवर
उपलब्ध आहे. दुरुस्ती नकाशांचे डिजिटायझेशन करून ते मूळ नकाशांशी
जोडण्याची कार्यवाही सुरू आहे.
५. मालमत्ता पत्रक तसेच 7/12 मध्ये न.भु.क्र. आणि सर्व्हे नंबरच्या स्वरूपात
अद्वितीय ओळख तपशील आहेत. संख्यात्मक कोडच्या स्वरूपात ULPIN
(युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर) वर काम सुरू आहे. तसेच
बहुमजली मिळकती बाबतच्या नियमाचा मसुदा शासनकडे मंजुरीसाठी
सादर करण्यात आलेला आहे.
क) फेरफार प्रक्रियेचे एकत्रीकरण-
दस्त नोंदणी प्रक्रियेसह फेरफार घेण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि दस्त नोंदवल्याबरोबर फेरफाराची सूचना देणेची कार्यवाही सुरु आहे. राज्यामध्ये नोंदणीकृत दस्तऐवजांसाठी 7/12 आणि मालमत्ता पत्रकामध्ये ऑटो ट्रिगर म्युटेशन राज्यभर सुरू करण्यात आले आहे.
ड) ऑनलाइन डॅशबोर्ड प्रकाशित करणे-
भूमी अभिलेख विभागाद्वारे प्रदान केलेल्या ऑनलाइन सेवांसाठी ऑनलाइन डॅशबोर्ड सार्वजनिक डोमेनमध्ये. https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
इ) तक्रारी दाखल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे-
EoDB नुसार स्थावर मालमत्तेची नोंदणी करण्याबाबत प्रभारी विभागामध्ये उद्भवलेल्या समस्येबद्दल तक्रारी दाखल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. ऑनलाइन तक्रारी दाखल करण्यासाठीची यंत्रणा विकसित करण्यात येत आहे.
फ) प्रत्येक मालमत्तेचा/प्लॉटचा संपूर्ण राज्यात युनिक आयडी अनिवार्य करणे-
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भूमी अभिलेख विभागात पारंपारिकपणे वापरल्या जाणार्या नामकरण प्रणालीवर आधारित प्रत्येक गावातील जमिनीच्या भूभागाला अद्वितीय ओळखकर्ता नियुक्त करण्यावर आधारित ULPIN च्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरु आहे. सध्या, ग्रामीण आणि शहरी जमिनीसाठीच्या अधिकार अभिलेखामध्ये तो चांगल्या प्रकारे परिभाषित केलेला आहे. ग्रामीण जमिनीच्या नोंदींसाठी जिल्हा, तालुका, गाव - पार्सल क्रमांक (सर्व्हे नंबर / गट नंबर आणि हिस्सा नंबर) द्वारे अभिलेखामध्ये भूभाग अद्वितीयपणे ओळखला जातो. शहरी जमिनीच्या नोंदींसाठी जिल्हा, तालुका, गाव/पेठ/कार्यालय इत्यादी (क्षेत्र) द्वारे अभिलेखामध्ये भूभाग अद्वितीयपणे ओळखला जातो. काही भागात भूभाग क्रमांक (नगर भूमापन क्रमांक / आलेख क्रमांक / भूखंड क्रमांक) नंतर आणखी एक स्तर आवश्यक आहे. उपरोक्त बाब विचारात घेऊन, विभाग वर नमूद केल्याप्रमाणे प्रचलित माहितीवर आधारित अद्वितीय क्रमांक तयार करून ULPIN लागू करण्याची योजना तयार करण्यात येत आहे. यासाठी 11 अंकी लांब कोड असेल (आज्ञावली द्वारे तयार झालेला क्रमांक) शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व भूभागासाठी देण्यात येईल. कोणतीही नवीन मालमत्ता निर्माण झाल्यास, एक नवीन ULPIN तयार केला जाईल आणि देण्यात येईल. जुन्या आणि नवीन ULPINS मधील संबंध देखील कायम राखले जातील. सर्व मालमत्तांसाठी ULPIN तयार करण्याचे काम सध्या सुरू असून त्याची अंमलबजावणी ऑगस्ट २०२२ पर्यंत होणे अपेक्षित आहे.
- आधार सिडिंग:-
EoDB नुसार, शेतजमिनीशी संबंधित धारकाच्या तपशिलांचे आधार सीडिंग आणि शासकीय वितरणासाठी बँक खाती लिंक करण्याची तरतूद करावी लागेल. सबसिडी आणि फायदे, विमा दावा समझोता. अधिकार अभिलेखामध्ये आधार सीडिंगची उपलब्धता रा.सु.वि.केंद्र, पुणे यांच्या मदतीने विकसित करण्यात येत आहे.
भागधारकांचा सल्ला-
पुढील सुधारणांच्या संभाव्य क्षेत्रांबद्दल औद्योगिक संस्था, नागरिक, वकील, सरकारी कार्यालये इत्यादी भागधारकांशी नियमितपणे सल्लामसलत केली जाते. सर्व भागधारकांना त्यांच्या सूचना dlrmah.mah@nic.in या मेलवर किंवा https://Mahabhumi.gov.in या वेबसाइटवर देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

- https://eodb.dpiit.gov.in/- EoDB, DPIIT
- https://dpiit.gov.in/- DPIIT
- https://dolr.gov.in/en- DoLR
- https://www.cersai.org.in/CERSAI/home.prg- CERSAI
- https://www.maharashtra.gov.in/1125/Home- Govt. of Maharashtra
- https://rfd.maharashtra.gov.in/en- Revenue & Forest Department, Govt. of Maharashtra
- https://mahabhumi.gov.in/mahabhumilink- Mahabhumi
- https://igrmaharashtra.gov.in/- IGR Maharashtra
eFERFAR(7/12) Statistics
PROPERTY CARD Statistics
All Divisions (As on Date: 03/08/2025)
Division | Todays Mutations Applications | Todays Mutations Disposed | Applications Received In Financial Year | Mutations Disposed In Financial Year |
---|