District Information

नांदेड
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा प्रदेशातील नांदेड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तरेस वसलेले आहे. नांदेड शहर शीख गुरुद्वारासाठी प्रसिद्ध आहे. नांदेड हे पुरातन वास्तू असलेले शहर आहे. असे म्हटले जाते की पौराणिक दिवसात पांडव नांदेड जिल्ह्यातून प्रवास करत असत.
नांदेडचा उल्लेख ‘लीलाचरित्र’ या महिम्भट्टाने लिहिलेल्या ग्रंथात आढळतो. यात शहरातील नरसिंहच्या मूर्तीचे वर्णन आहे. नांदेड पूर्वी “नंदीतट” म्हणून ओळखले जात असे. नांदेड जिल्ह्यात नांदेड सह 16 तालुके आहेत व गावांची संख्या 1652 आहेत. तालुक्यांची नावे पुढीप्रमाणे मुदखेड, लोहा, नायगांव, बिलोली, देगलुर, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर, व नांदेड.

भौगोलिक स्थान:-
नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10422 चौ.कि.मी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान 953.8 मी.मी आहे.
नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोऱ्यात आग्नेय महाराष्ट्रात वसला आहे. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, हिंगोली व यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद तेलंगणातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, आसना, मन्याड व पैनगंगा. नांदेड हे नाव श्री शंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून उगम पावले असल्याचे सांगण्यात येते.
नांदेड जिल्हा नकाशा
1 |
नांदेड |
|
2 |
नांदेड |
|
3 |
अर्धापुर |
|
4 |
भोकर |
|
5 |
मुदखेड |
|
6 |
लोहा |
|
7 |
कंधार |
|
8 |
किनवट |
|
9 |
हदगाव |
|
10 |
हिमायतनगर |
|
11 |
धर्माबाद |
|
12 |
नायगांव |
|
13 |
उमरी |
|
14 |
बिलोली |
|
15 |
मुखेड |
|
16 |
देगलूर |
|
17 |
माहुर |
जनसांखीकी
2011 च्या जनगणनेनुसार जनसांखीकी माहिती
विवरण |
संख्या |
क्षेत्र |
10528 चौ. कि.मी. |
एकूण लोकसंख्या |
3361292 |
एकूण पुरुषांची लोकसंख्या |
1730075 |
एकूण स्त्री लोकसंख्या |
1631217 |
लिंग गुणोत्तर |
943 |
शहरी लोकसंख्या |
913898 |
ग्रामीण लोकसंख्या |
2447394 |
शहरी लोकसंख्येची टक्केवारी |
27.2 |
ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी |
72.8 |
लोकसंख्या घनता |
319 / चौ.किमी. |
साक्षरतेचे प्रमाण |
75.45 |
साक्षरतेचे प्रमाण पुरुष |
84.27 |
साक्षरतेचे प्रमाण स्त्री |
66.15 |
उप विभाग |
8 |
तालुक्यांची संख्या |
16 |

मंत्रालयीन स्तर
महसुल व वन विभाग, महाराष्ट्र राज्य
विभागाचे नांव:- भूमि अभिलेख (महसुल व वन विभाग)
राज्य स्तर
मुख्य विभाग प्रमुख:- मा.जमाबंदी आयूक्त आणि संचालक भूमि अभिलेख महा.राज्य, पुणे
विभागीय स्तर
विभाग प्रमुख:- मा.उप संचालक भूमि अभिलेख औरंगाबाद, प्रदेश औरंगाबाद
जिल्हा स्तर
कार्यलयाचे नांव:-जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड
कार्यालय प्रमुख:- जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, नांदेड
पत्ता :- जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ,नांदेड
दुरध्वनी क्रमांक :- 02462-230481 Email :- slrnanded@yahoo.in
तालुका स्तर
कार्यालय प्रमुख:- उप अधीक्षक भूमि अभिलेख
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांचे कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयांची माहिती
अ.क्र. |
कार्यालयाचे नाव |
कार्यालयाचा पत्ता |
ई-मेल आडी |
दूरध्वनी क्र |
1 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड |
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड परिसर, ता.जि. नांदेड |
02462-234039 |
|
2 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख अर्धापूर |
प्रशासकिय इमारत अर्धापूर जि. नांदेड |
02462-272745 |
|
3 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख हदगाव |
शासकिय गोदाम परीसर हदगाव जि. नांदेड |
02468-222149 |
|
4 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख माहूर |
प्रशासकीय इमारत पहिला माळा माहूर जि. नांदेड |
02460-268126 |
|
5 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख किनवट |
प्रशासकिय इमारत पहिला माळा किनवट जि. नांदेड |
dyslrkinwat@gmail.com |
02469-222375 |
6 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख हिमायतनगर |
तहसिल इमारत हिमायतनगर जि. नांदेड |
02467-244099 |
|
7 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख भोकर |
तहसील कार्यालय परीसर भोकर जि. नांदेड |
02467-223217 |
|
8 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख मुदखेड |
प्रशाकीय इमारती च्या बाजूला उमरी रोड मुदखेड जि. नांदेड |
02462-275145 |
|
9 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख उमरी |
तहसील कार्यालय इमारत गोरठा रोड उमरी जि. नांदेड |
02467-244090 |
|
10 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख धर्माबाद |
तहसील कार्यालय परिसर धर्माबाद जि. नांदेड |
02465-244044 |
|
11 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख बिलोली |
द्त्त टेकडी बि.एस.एन.एल ऑफीस जवळ बिलोली जि. नांदेड |
02465-223023 |
|
12 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख नायगाव |
डी.बी. पाटील होटाळकर कॉम्पलेक्स शेळगाव रोड, नायगाव जि. नांदेड |
02465-262036 |
|
13 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख देगलूर |
जुने तहसिल कार्यालयाजवळ, सिंधु कॉलेज समोर देगलूर जि. नांदेड |
02463-255180 |
|
14 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख मुखेड |
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मुखेड जि. नांदेड |
02461-222639 |
|
15 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख कंधार |
तहसिल कार्यालय परिसर, मेन रोड कंधार जि. नांदेड |
02466-223795 |
|
16 |
उप अधीक्षक भूमि अभिलेख लोहा |
तहसील कार्यालय परिसर लोहा जि. नांदेड |
02446-242102 |

नगर भुमापन
ही शाखा राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील ठरविण्यात आलेल्या हद्दीतील मालमत्तांच्या नगर भूमापनाचे कामाशी संबंधित आहे. नगर भूमापन नकाशे आणि मालमत्ता पत्रकांच्या स्वरूपात नगर भूमापनाच्या नोंदी ठेवण्यात येतात. विभागामार्फत आतापर्यंत गावठाण गावे, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्राचे नगर भूमापन करण्यात आले आहे. मा.जमाबदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख म.राज्य पुणे यांचेमार्फत खालील योजना राबविल्या जातात.
1.महास्वामित्व योजना
2.नगर परीषद नगर भुमापन
3.संगणीकृत मिळकत पत्रिका
4.ई-फेरफार
1.महास्वामित्व योजना:-
सदर योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, भूमि अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने महाराष्ट्रातील गावठाण भूमापन न झालेल्या गावांचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापनाचे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी शासन निर्णय पारीत केला असून या अनुषंगाने GIS आधारे गावांच्या गावठाणातील मिळकतींचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे व संगणीकृत नकाशे,सनद व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत.
सदर गावठाण भुमापनामुळे जिल्हयातील गावठाणातील घरांचे नकाशा व सिमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे त्याची नोंद होईल, ग्रामस्थांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल, गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सिमा निश्चित होवून अतिक्रमण रोकता येईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मिळकत धारकांना घरावर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होईल, ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होतील.
नांदेड जिल्हयात 16 तालुक्यात महास्वामित्व योजने अंर्तगत जुने गावठाण असलेले एकुण 1428 गावे असुन त्यापैकी 878 गावांचे ड्रोनव्दारे गावठाण भूमापनाचे काम पुर्ण झाले आहे.तसेच 34 गावांचे सनद पुर्ण झाले आहे. 13822 मिळकतीचे मिळकत पत्रिका तयार झाले आहेत.
2.नगर परीषद नगर भुमापन:-
सन 2000 पासून विभागाकडून महापालिका क्षेत्रामध्ये खासगी संस्थांची मदत घेऊन नगर भूमापनचे काम करण्यात येत आहे. तसेच राज्यातील 61 नगरपरिषदांच्या नगर भूमापनाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापैकी नांदेड जिल्हयातील 10 नगरपरिषदांच्या नगर भूमापनाचे काम करावयाचे आहे. धर्माबाद नगरपरिषदेचे Drone Fly चे काम पुर्ण झाले आहे.
3.संगणीकृत मिळकत पत्रिका/ e -PCIS अज्ञावली :-
या कार्यालयाच्या अधिनस्त एकुण 16 तालुके आहेत. त्या कार्यालयातील नगर भुमापन संकलनाकडील मिळकत पत्रिका हे जनतेसाठी ऑनलाईन पध्दतीने प्राप्त होणे करीता सर्व प्रथम डाटा ईन्ट्री करण्यात आली आहे. त्या नंतर मा. जमाबंदी आयुक्त पुणे यांचे मार्गदर्शना खाली Epcis हि आज्ञावली विकसित केली आहे. माहे एप्रिल-2021 पासुन नांदेड जिल्हयात 16 तालुकांमध्ये Online पध्दतीने फेरफारचे अर्ज Epcis आज्ञावली मध्ये स्विकारण्यात येत असुन Online पध्दतीनेच Epcis आज्ञावली मध्ये Digital Sign द्वारे फेरफार मंजुर करण्यात येत आहे. त्या मुळे अर्जदार यांना महाभुलेख वेब साईड वरुन Online द्वारे मिळकत पत्रिकांची Print Out घेता येत आहे.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in
4.Online Mutation / ई फेरफार कार्यक्रम:-
सदर योजने अंतर्गत उप अधीक्षक भूमि अभिलेख, तहसिल कार्यालय व नोंदणी कार्यालय हे दुरसंचार निगमच्या VPN प्रणालीदवारे एकमेकास जोडून ई फेरफार हा कार्यक्रम राबविण्याचा आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील उपरोक्त तिन्ही कार्यालयास तीन संगणक संच व त्याअनुषंगाने आवश्यक असलेले संगणक साहित्य शासनाकडून पुरविण्यात आलेले असून MPLS Connectivity 16 तालुक्याची झाली आहे.
ई फेरफार प्रभावीपणे राबविण्याकरिता संबधीत कर्मचा-यांचे Digital Singnature प्राप्त करून घेण्यात आले आहे. सदरचा डेटा e PCIS अज्ञावलीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. e PCIS अज्ञावलीमध्ये नांदेड जिल्हातील एकुण मिळकत पत्रिका 15657 पैकी 152016 Digital Signature झाले आहेत. डिजीटल साईन झालेल्या मिळकत पत्रिका एकुण संख्या 152657 पैकी 152013 मिळकत पत्रिका डिजीटल साईन झालेल्या आहेत सदर कामाची 99.57 % ईतकी झालेली आहे.
https://mahabhumi.gov.in/