District Information

इतिहास
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे.
चंद्रपूर व ब्रम्हपुरी मधील जमिनदारी व मालमत्तेचे हस्तांतरण करून गडचिरोली तहसील म्हणून १९०५ पासून अस्तित्वात होती. ब्रम्हपुरी ऐवजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात मोडतो. फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्र्कुट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य, देवगीरीचे यादव यांचे साम्राज्य होते. यानंतर गडचिरोलीच्या गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात, खन्डक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याचकाळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा ) प्रदेशाचा भाग ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी च्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटीशांनी १९०५ मध्ये चंद्रपूर व ब्राम्ह्पुरीची जमिनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तहसीलची निर्मिती केली. राज्याची पुनर्ररचना होण्यापुर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेट मध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना करून त्यामध्ये चंद्रपूर हे जिल्हा म्हणून समाविष्ट करण्यात आले. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी ऐवजी स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला.
गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून आहेत. गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्सल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोली जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थित लोक आश्रय घेतात.
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १०७२९४२ असून पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या अनुक्रमे ५४१३२८, ५३१६१४ याप्रमाणे आहे ( २०११ च्या जनगणने नुसार). जिल्ह्यात अनुसूचित जाती व जमाती ची लोकसंख्या अनुक्रमे १२०७४५ व ४१५३०६ ऐवढी आहे. जिल्ह्याची एकूण साक्षरता ७४.४ टक्के आहे. जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्येची टक्केवारी ११.२५ % व ३८.७ % अनुक्रमे आहे.
गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा अतिदुर्गम, डोंगर द-याने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी जवळपास ७६ % टक्के भाग जंगलाने व्याप्त आहे. हा जिल्हा बांबुचे झाड व तेंदू ची पाने करीता प्रसिध्द आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पिक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिल चा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहित. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरणी ची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेची सुविधा आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यतः गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलगु, बंगाली, छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाने प्रशासकीयदृष्ट्या एकूण सहा उपविभाग (गडचिरोली, वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा) निर्माण केले असुन प्रत्येक उपविभागात दोन तालुके सामाविष्ट करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात एकूण १२ तालुके आहेत. जिल्ह्यात ४५७ ग्रामपंचायती असून १६८८ राजस्व गावे अस्तित्वात आहेत. जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा व एक लोकसभा क्षेत्र (चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून) असून १२ पंचायत समीती आहेत. जिल्ह्यात ९ नगर पंचायती असून गडचिरोली, देसाईगंज (वडसा) व आरमोरी या शहरात नगरपालिका आहेत.
गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वे कडे वाहत असून तिचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून दक्षिण भागाला जिल्हा वसलेला आहे. गोदावरी नदीच्या उपनद्या जसे प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या उपनद्या मिळून) व इंद्रावती ह्या मुख्य नद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात.
जिल्ह्याचे पूर्वेत्तर भागात, धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा तालुके असून घनदाट जंगलाने व्याप्त आहे. जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत.

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने वेगळा करण्यात आला. पूर्वी हा चंद्रपूर जिल्ह्याचा भाग होता आणि गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपूर्वी गडचिरोली आणि सिरोंचा ही दोनच ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्याची तहसिल होती.
गडचिरोली तहसिलची निर्मिती १९०५ मध्ये ब्रह्मपुरी व चंद्रपूर तहसिल येथून जमींदारी इस्टेट हस्तांतरित करून करण्यात आली. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
लोकबिरादरी प्रकल्प (एलबीपी)
लोकबिरादरी प्रकल्प (एलबीपी) हे महाराष्ट्र सेवा समिती, वरोरा जि. चंद्रपूर द्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत रुग्णालय, शाळा व पशु अनाथालय चालविल्या जाते. 23 डिसेंबर 1973 रोजी सामाजिक कार्यकर्ते मा. बाबा आमटे यांनी माडिया गोंड यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरु केले. सदर प्रकल्प गडचिरोली जिल्हा मुख्यालय पासून 160 कि.मी. अंतरावर आहे व आल्लापल्ली पासून 60 कि.मी. दूरवर आहे.
डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या मेडिकल डायरेक्टर व मेडिकल ऑफिसर म्हणून येथे काम करतात व परिसरातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्द करून दिल्या आहेत. त्यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी 2008 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सध्याची प्रशासकीय रचना
जिल्हा भूमी अभिलेख प्रमुख :- भूमी अभिलेखाचे जिल्हा अतिउच्चांकन
हेडक्वाटर :- नागपूर
कार्यालयाचा पत्ता :- जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, संकुल परिसर, गडचिरोली 442605
संपर्क क्रमांक :- 07132-297487
ई-मेल आयडी :- dslr.gadchiroli@rediffmail.com
तालुके संख्या :- 12
उप-अधिसभा कार्यालयांची संख्या :- 12
तालुकास्तरावरील कार्यालयांची संख्या ;- १२

भू-महसूल संहितेच्या तरतुदींनुसार सादर केलेल्या शहर सर्वेक्षणांच्या देखरेखीसाठी आणि अधिकारांच्या नोंदी आणि त्याच्याशी जोडलेले नकाशे आणि शहर-सर्वेक्षण केलेल्या क्षेत्राच्या महसूल प्रशासनास मदत करण्यासाठी देखभाल सर्व्हेअरचे कर्मचारी जबाबदार आहेत. ते शहर सर्वेक्षण अधिकारी यांच्या तात्काळ नियंत्रणाखाली काम करतात. गडचिरोली जिल्ह्यातील 12 उपअधीक्षक भूमी अभिलेख, त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांची संख्या आणि मालमत्ता कार्डची संख्या खालील तक्त्यामध्ये दिली आहे
अ.क्र |
शहर सर्वेक्षण कार्यालयांची नावे |
अधिकारक्षेत्रातील गावांची संख्या |
गुणधर्मांची संख्या |
1 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, गडचिरोली |
6 |
10107 |
2 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, चामोर्शी |
31 |
13353 |
3 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, मुलचेरा |
23 |
4603 |
4 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, एटापल्ली |
1 |
1034 |
5 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, भामरागड |
1 |
794 |
|
उप अधिक्षक भुमि अभिलेख, अहेरी |
3 |
5634 |
7 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, सिरोंचा |
4 |
4059 |
8 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, वडसा |
8 |
6601 |
9 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, आरमोरी |
9 |
11712 |
10 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, कुरखेडा |
4 |
2515 |
11 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख, कोरची |
1 |
928 |
12 |
उप अधिक्षक भुमि अभिलेख,धानोरा |
3 |
2352 |
Total |
94 |
63692 |
वर नमूद केलेले सर्व गावाचे प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरी केलेले आहेत आणि लोकांसाठी उपलब्ध आहेत सरकारच्या पेमेंटवर https://mahabhumi.gov.in/mahabhumilink वेबसाइट. फी
वरील वेबसाइटवरून डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया - - - खालील pdf फाइलवर क्लिक करा. ऑनलाइन शोध पत्रिका डाऊनलोड करण्याची पध्दत.pdf

महत्त्वाचा टप्पा गाठला
CORS ची स्थापना
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा, वडसा, मुलचेरा, कोरची येथे चार सतत कार्यरत संदर्भ केंद्र आहेत. CORS हे ROVERS नेटवर्कसाठी बेस टॉवर्स असतील जे प्रशासनाला मोजमाप प्रकरणांची शून्य प्रलंबितता प्राप्त करण्यास मदत करतील. तसेच अचूक आणि जलद मापन तयार करेल ज्यामुळे मापनातील छेडछाड रद्द होईल.