District Information

धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा.
धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ. किमी आहे. जिल्ह्याची सिमा पुर्वेकडे जळगाव जिल्हा, दक्षिणेकडे नाशिक जिल्हा, पश्चिमेकडे नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य आणि उत्तरेला मध्य प्रदेश राज्याला लागून आहे.

धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ. किमी आहे. जिल्ह्याची सिमा पुर्वेकडे जळगाव जिल्हा, दक्षिणेकडे नाशिक जिल्हा, पश्चिमेकडे नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य आणि उत्तरेला मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. लळिंग किल्ला, पूर्व पश्चिम गेलेल्या गाळणा टेकड्यावर लळिंग किल्ला आहे लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी आणि महादेव मंदिर,देवपुरचे स्वामीनारायण मंदिर, धरणे,शिरपुरचे बिजासन(विंध्यावासिनी) देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ, नगांवचे दत्त मंदिर, तसेच पेढकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धुळे
↘️
उप अधीक्षक भूमी अभिलेख (धुळे, शिरपूर, साक्री , शिंदखेडा ) नगर भूमापन अधिकारी धुळे
↘️
मुख्यालय सहाय्यक/ शिरस्तेदार/प्रमुख लिपिक
↘️
परिरक्षण भूमापक / निमतानदार
↘️
भूकरमापक / छाननी लिपिक/प्रतिलिपी लिपिक/नगर भूमापन लिपिक/आवक जावक लिपिक/कनिष्ठ लिपिक/अभिलेखपाल/दुरुस्ती लिपिक
↘️
दप्तरबंद

धुळे जिल्यातील मूळ भूमापन अंदाजे १८५६-५७ सालात झाल्याचे नोंदी जिल्ह्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयातील उपलब्ध असलेल्या विविध अभिलेखावरून दिसून येतात. जिल्यात सर्वात जुनी नगर भूमापन योजना नगर भूमापन अधिकारी धुळे यांचे कार्यालयातील धुळे शहराची असून सदर नगर भूमापन योजना सन १९२५-३० सालाचे दरम्यानचे असल्याचे विविध उपलब्ध अभिलेखावरून दिसून येते त्यानंतर धुळे शहराची विस्तारित नगर भूमापन योजना १९८७ नंतर टप्प्याटप्प्याने झाल्याचे दिसून येते.

धुळे शहरातील मूळ गावठाणाचे नगर भूमापन १९१४-१५ पासून झाल्याचे दिसून येते आणि विस्तारित नगर भूमापन महानगरपालिका हद्दीतील मिळकतीचे नगर भूमापन १९८७ पासून झालेले आहे. तरी धुळे शहरात ८७००० मिळकतीच्या मिळकत पत्रिका तयार झालेल्या आहे. धुळे महानगर पालिका हद्दीतील धुळे विस्तारित देवपूर, महिंदळे, वलवाडी, मोहाडी प्र. लळींग इत्यादी गावांच्या नगर भूमापन करणेकामी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील ज्ञापन क्रमांक/न.भू./३१८४/२९३९२/३८१४/ल १/दि. १९/०२/१९८७ अन्वये परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच धुळे विस्तारित क्षेत्राचे काम प्रत्यक्षात दि. १७/०३/१९८८ पासून सुरु केले होते. त्यानुसार मा .जिल्हाधिकारी धुळे यांचेकडील पत्र क्र .९०/बी/कक्ष २/गावठांण/१८४७ दि . १९/१२/१९९० चे पत्रान्वये महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १२६ प्रमाणे जाहीर नोटीस काढून कलम १२२ प्रमाणे अधिसूचना केली आहे.

⚫सुलवाडे जामफळ धरणाकरिता ४०० हेक्टर भूसंपादन मोजणी केली.
⚫अक्कलपाडा धरणाचे ६५० हेक्टर भूसंपादन मोजणी केली.
⚫स्वामित्व योजनेअंतर्गत ३१७ गावांचे गावठाणाचे नगर भूमापन योजनेचे कामकाज सुरु.
⚫जिल्हा नियोजन समिती कडून धुळे जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागास ५ ई. टी. एस . मशीन , ५ रोव्हर , ५ प्लॉटर प्राप्त.▶️