मानवी वस्त्यांचा जसजसा विकास होत गेला तसे मानवाने शेती करून त्या ठिकाणी स्थायिक होण्यास सुरुवात केली. मानवी समूहाला त्यानंतर जमिनीचे महत्त्व समजले व जमिनीच्या सुरक्षिततेसाठी त्याने जमिनीस बांधबंधिस्ती करण्यास सुरुवात केली. भारतामध्ये जमिनीच्या प्रशासनासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी वेगवेगळे नियम ठरवून दिले होते. मुघलांच्या काळामध्ये असणारया जमिनीच्या मोजणी व सारा आकारणीचया पद्धतीमध्ये ब्रिटिश कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले. त्याचप्रमाणे जमिनीची शास्त्रोक्त पद्धतीने मोजणी व प्रतवारी करून जमिनीच्या प्रतीनुसार सारा आकारणी करण्यात आली. ब्रिटिश कालावधीमध्ये भारतातील विविध राज्यांमध्ये भूमापन मोजणी करण्यात आली व त्यानंतर भूमापन अभिलेख व अधिकार अभिलेख तयार करण्यात आले. ब्रिटिशांनी प्रथमतः कलकत्ता, मद्रास व मुंबई इलाख्या मध्ये भुमापनाचे काम सुरू केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर राज्यांमध्येही भूमापनाचे काम करण्यात आले. परंतु भूमापनाची व अभिलेख तयार करण्याची पद्धत प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या महसुली रचनेमुळे वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. त्यामुळे देश
Blogs |
---|
![]() Handbook on Land Survey in India या पुस्तकाबाबत माहितीपर लेख-श्री शाम खामकर
by
Admin. |
जाने 13, 2023
|
माणसं जोडणारी ई-पीक पाहणी प्रणाली-श्री बालाजी अर्जुन शेवाळे
by
Admin. |
जाने 18, 2023
आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट आणि फेसबुक सारख्या असंख्य समाज माध्यमामुळे आज जगातील मानसं जवळ आलेली आहेत. हे कश्या मुळे...?तर काळानुसार आधुनिकतेची कास धरून शासनस्तरावर लोकाभिमुख क्रांतिकारक निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या दक्ष अशा प्रशासनामुळे...! ग्रामीण भागातील विकास कार्यक्रमाचे नियोजन प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षपणे शेती व्यवसायाशी संबंधित आहे. कृषी विकास कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करतांना वेगवेगळ्या पिकाखालील क्षेत्रांची अद्यावत आणि बिनचूक माहिती व आकडेवारी ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. दरवर्षी शेती उत्पन्नाचा वेळोवेळी अंदाज घेऊन शेतकऱ्यांना द्यावयाचा वेगवेगळ्या सवलती आणि मदत कार्याचे नियोजन करण्याकरीता सुद्धा पिका खालील क्षेत्राची अद्यावत व बिन चूक माहिती असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम १९७१ चे नियम ३० मध्ये नमूद केले नुसार पिक पाहणीचे काम १ ऑगस्ट ला सुरु करून १५ आक्टोबर पर्यंत करणे अभिप्रेत आहे. अलीकडे भुईमुग, मुंग, उडीद, संकरीत ज्वारी,सोयाबीन,मका इत्यादी अल्प मुदतीच्या पिंकांची कापणी लवकर होते म्हणून हे पिक पा ![]() |
![]() सर्व्हे प्रशिक्षण NIGST सर्व्हे ऑफ इंडिया, हैद्राबाद-श्री अमोल भोसले
by
Admin. |
जाने 23, 2023
सर्व्हे प्रशिक्षण NIGST सर्व्हे ऑफ इंडिया, हैद्राबाद “Wisdom comes not from age but from education & learning” मनुष्यबळ विकासासाठी सातत्याचे अद्ययावत प्रशिक्षण फार मोलाचे आहे. म्हणूनच, आधुनिकीकरण आणि तांत्रिकी बाबींमध्ये आघाडीवर असणा-या भूमि अभिलेख विभागामार्फत कर्मचारी आणि अधिका-यांसाठी सातत्यपूर्वक व चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण असायला हवे यासाठी माननीय जमांबंदी आयुक्त सतत प्रयत्नशील असतात . हैद्राबाद येथील सर्व्हे ऑफ इंडियाच्या NIGST या प्रशिक्षण संस्थेमार्फत Surveying या विषयासाठी आम्हा 20 अधिका-यांना संधी देण्यात आली. सर्व्हे ऑफ इंडिया ही सन 1767 पासून देशपातळीवर नकाशांबाबत कार्य करणारी केंद्र शासनाची सर्वात जुनी वैज्ञानिक संस्था आहे. NIGST चा जन्म मूलत: कर्मचारी /अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी झाला असून ती सध्या सर्व्हे तंत्रज्ञानातील प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था म्हणून नावाजलेली आहे. NIGST मार्फत Surveying, cartography आणि इतर surveying technique बाबत विविध शासकीय आणि खाजगी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाते. Geomatic and Geosptial survey या विषयात दोन |