आस्थापना शाखा
जमाबंदी आयुक्त कार्यालयातील आस्थापना शाखेमार्फत भूमी अभिलेख विभागाच्या राज्यातील आस्थापना व लेखा विषयक बाबीवर कार्यवाही केली जाते. राज्यामध्ये भूमी अभिलेख विभागा मध्ये वर्ग-1 चे 54 व वर्ग-2 चे 432 अधिकारी असून एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वर्ग-3- 6560 व वर्ग-4 -2644 आहे. वर्ग-2 व त्यावरील सर्व अधिकाऱ्यांशी संबंधित आस्थापनाविषयक बाबी जसे की, पदोन्नती, बदली, रजा, परिविक्षाधिन कालावधी समाप्ती, सेवा निवृत्ती, न्यायालयीन प्रकरणे, स्वेच्छा सेवा निवृत्ती, पदभार हस्तांतरण, सेवा, पुनर्विलोकन, गोपनीय अहवाल, सांविधानिक अधिकार, आश्वासित प्रगती योजना, जेष्ठता याद्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठविणे. विभागीय चौकशी इत्यादी बाबतची कार्यवाही या शाखेकडून करण्यात येते. त्याचप्रमाणे भूमि अभिलेख विभागामध्ये वर्ग 3 पदसमूह-4 मध्ये नव्याने नियुक्ती करण्यासाठी भरती प्रक्रियेची कार्यवाही या शाखेकडून करण्यात येते. राज्यातील भुमि अभिलेख विभागाचा अर्थसंकल्प, अंदाजपत्रक तसेच लेखाविषयक सर्व बाबी या विभागाकडून हाताळण्यात येतात. भूमि अभिलेख विभागातील सर्व कार्यालयांचे अंतर्गत लेखा परीक्षण करण्याची कार्यवाही या शाखेकडून करण्यात येते.
