प्रकल्प व्यवस्थापन संस्था
विभागातील विविध प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयात प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (PMU) ची स्थापना करण्यात आली आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (PMU) विविध प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवते, जसे की भूमापन नकाशांचे डिजिटायझेशन, विभागासाठी GIS वातावरण तयार करणे, आधुनिक भूमापन तंत्राचा वापर, ड्रोन सर्वेक्षण, ई-ऑफिस, नेटवर्क व्यवस्थापन, e-PCIS, 7/12 संगणकीकरण, भूमि अभिलेख आणि नकाशा अभिलेखांची सांगड, इतरसंस्थासह डेटा सामायिकरण इ. PMU मध्ये भूमापन नकाशांचे डिजिटायझेशन, विभागासाठी GIS वातावरण तयार करणे, ड्रोन भूमापन, CORS आणि संबंधित भूमापन उपक्रम पाहण्यासाठी दोन GIS सल्लागार नियुक्त करण्यात आले आहेत.त्याचप्रमाणेगॅप अॅनालिसिस, नेटवर्क डिझाइन, ई-पीसीआयएस आणि 7/12 मॉड्युल इ. पाहण्यासाठी IT सल्लागार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.